तुमच्याकडे ॲक्टिव्ह प्लॅन असला तरीही तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करत असताना तुम्हाला किंमतीच्या पेजवर रीडायरेक्ट केले जाते याची काही कारणे आहेत.
इमेजचे प्लॅन
कृपया याची खात्री करा की तुमच्या प्लॅनमधील लायसन्सप्रमाणेच तुम्ही फाइल डाउनलोड करता आहात. सर्व सब्सक्रिप्शनमध्ये मानक लायसन्स असते. EL चा अर्थ एक्सटेंडेट लायसन्स असा होतो (XL चा वापर इमेजच्या आकारासाठी केला जातो).
जर तुमचे एकापेक्षा जास्त प्लॅन एकाच वेळी सुरू असतील, तर अशा प्लॅनवर स्विच करा ज्यामध्ये काही डाउनलोड उरलेले असतील.
एकसारखे लायसन्स असलेल्या प्लॅनसाठी, जर तुमचे एकापेक्षा जास्त प्लॅन एकाच वेळी सुरू असतील, तर डाउनलोड उरलेले आहेत अशा प्लॅनला सिस्टम आपोआप निवडेल.
व्हिडिओ प्लॅन
तुम्ही अशा आकाराचा व्हिडिओ डाउनलोड करत आहात जो तुमच्या खरेदी केलेल्या पॅकेजमध्ये नाही याची शक्यता जास्त आहे. "डाउनलोड करा" हे बटण क्लिक करण्यापूर्वी कृपया खात्री करा की तुम्ही तुमच्या प्लॅनप्रमाणेच आकार निवडला आहे.
डाउनलोडची संख्या पूर्ण झाली
जर तुम्ही तुमचे सर्व उपलब्ध डाउनलोड पूर्ण केले असतील, तर तुमच्या डाउनलोडची संख्या रीसेट होईपर्यंत तुम्ही अधिक इमेज डाउनलोड करू शकणार नाही. पण जर तुम्हाला रीसेटच्या आधी आणखी डाउनलोड पाहिजे असतील, तर तुम्ही केव्हाही अतिरिक्त डाउनलोड खरेदी करू शकता.
तुमचे किती डाउनलोड उरले आहेत हे तपासण्यासाठी कृपया होम पेजवर जाऊन साइटच्या उजव्या सर्वात वरच्या कोपऱ्यातील प्लॅन किंवा "ॲक्टिव्ह प्लॅन" या बटणावर क्लिक करा.
बिलिंग-संबंधी समस्या
क्रेडिट कार्ड कालबाह्य झाले आहे किंवा अकाउंटमध्ये पुरेसे पैसे नाही अशा काही पेमेंट-संबंधी समस्यांमुळे जर तुमचे सब्सक्रिप्शन रिन्यू झाले नसेल, तर तुम्ही नवीन प्लॅन खरेदी करेपर्यंत तुमचे डाउनलोड उपलब्ध राहणार नाहीत.
जर तुम्ही नवीन प्लॅन खरेदी केला आणि तुमचे जुने, न वापरलेले डाउनलोड तुमच्या बॅलन्समध्ये दिसत नाहीत, तर कृपया आमच्या ग्राहक सेवा टीमशी संपर्क साधा आणि तुमच्या प्लॅनच्या रोलओव्हर मर्यादेपर्यंत आम्ही त्यांना रीसेट करू.
तुमच्या सब्सक्रिप्शनचे स्टेटस तपासण्यासाठी कृपया साइटच्या उजव्या सर्वात वरच्या कोपऱ्यातील प्लॅन किंवा "ॲक्टिव्ह प्लॅन" या बटणावर क्लिक करून खात्री करा की सर्व काही अप-टू-डेट आहे.
जर तुम्हाला यांच्या व्यतिरिक्त इतर कुठली समस्या येत असेल, तर आमचा सल्ला आहे की तुम्ही आमच्या ग्राहक सेवा टीमशी संपर्क साधावा म्हणे आम्ही तुमची मदत करू शकू.
Comments
0 comments
Article is closed for comments.